Saturday, 16 July 2016

रघुवीर चौधरी : एक कविता : भावानुवाद                                                             दि. १३ जुलै २०१६


 कालच या वर्षीच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली.
या वर्षी गुजराती भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार सन्माननीय रघुवीर चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले आहे. माझ्यासाठी संपूर्णतः अपरिचित नाव होते. म्हणूनच कुतूहलही होते. माहिती घेतली.
माहितीजालावर एक कविता वाचायला मिळाली.
तिच्या सरळ साध्या आविष्करणाने मोहिनीच घातली.
सहज संवाद करावा तशी ती जणू बोलूच लागली. 
मला कळावे अशा माझ्याच भाषेत....
અમારો ચાલુ રહ્યો પ્રવાસ!
ગણ્યા વિસામા જેને એ તો હતો માત્ર આભાસ!

રણ જેવા આ મનમાં
લીલા વન શાં તમને સાથે લીધા,
તમે પાઓ છો તેથી તો
મેં છતે જાણતે મૃગજળ પીધાં.
હવા કાનમાં કહી ગઈ કે ફૂલમાં ક્યાં છે વાસ?
અમારો ચાલુ રહ્યો પ્રવાસ.
જે પગલાંમાં કેડી દેખી
દૂર દૂરની મજલ પલાણી;
પાછા વળનારાની પણ છે
એ જ નિશાની, આખર જાણી!
હવે થાકના ટેકે ડગલાં ભરી રહ્યો વિશ્વાસ!
અમારો ચાલુ રહ્યો પ્રવાસ!
રઘુવીર ચૌધરી
भावानुवाद
माझा अविरत असे प्रवास l
गणू नका विश्राम असे तो तर केवळ आभास l l

रणसे मन्मन, परी त्यांत तू
लीलांचे वन दिलेस संगे l
भेटलास तू असे मानुनी
मृगजळात भिजलो सर्वांगे l l
झुळूक पुसे हलके असतो का फुलांत बंद सुवास ?
माझा अविरत असे प्रवास l l
अंगणातुनी चरण उचलुनी
दिगंतारेखा दूर पाहिली l
अन वाटेवर वळले त्यांची
ठशात होती ओळख उरली l l
जरा टेकलो तरि गाठोडे भरुनी असे विश्वास
माझा अविरत असे प्रवास l l

[ मूळ गुजराती कविता : रघुवीर चौधरी ]


No comments:

Post a Comment