|| वाजला अल्लख ...||
आज आषाढ पौर्णिमा. व्यासपौर्णिमा..गुरूपौर्णिमा !
आपापल्या प्रेरणा पुन्हा एकदा तपासून...तेजाळून घेण्याचा दिवस. सकाळपासून मन मागे मागेच धावत होते. मनात उभारलेली प्रेरणांची दीपमाळ पाहत होतो. कितीतरी दिवे तिथे तेवत होते. तत्त्वविचारांनी जागविणारे, भाषणांच्या शब्दांनी फुलविलेले, स्वरांनी गुंजन करणारे, पुस्तकांनी तेजाळलेले, स्पर्शांनी जोजविलेले, सहवासांतील सलगीने स्निग्धावलेले ..... दिवे.
आज आणि प्रतिवर्षीच ही दीपमाळ मी असा कृतज्ञतेने न्याहाळतो. दिव्यांच्या जितके समीप जावे तितकी त्यांची अधिक प्रभा मला उजळत जाते. अधिक उर्जेने मन ओतप्रोत भरून जाते. तसेच नवी जाग हे दीप देतात. मनांत झगमगणाऱ्या दीपमाळेतील हे दीप त्यांतील वाती पुढे सरकविण्यासाठी, त्या वातींवर जमा झालेली काजळी काढून टाकण्यासाठी, अधिक तेल घालण्यासाठीही सुचवतात...शिकवतात. असा हा आपल्यातील विद्यार्थीपण जागे करणारा, प्रेरणांना नव्याने उजळवून घेण्याचा उत्सव आहे असे वाटते.
आणि या उत्सवाला आषाढाची मोठी अन्वर्थक आरास लाभलेली असते. मेघांनी दाटून आलेल्या आभाळातील चंद्रबिंबाचं लपणं, धूसर...प्रभाहीन होणं आपल्या मनातील आणि म्हणूनच कृतीतील हरवलेल्या प्रेरणांसारखेच नाही का ? आकाशातील ते मेघजाल दूर सारून अवतरणारे आणि अवचितपणे अवघी सृष्टी उजळून टाकणारे चंद्रबिंब हा साक्षात्कार नाही तर दुसरे काय ? शिष्याला भानावर आणणारा पूर्णचंद्र हा गुरू संकल्पनेचा चिरप्रेरक अवतारच म्हणायला हवा..
चंद्राला सामान्यतः प्रणयाचा सखा मानले जाते. पण हा आषाढातील पूर्णचंद्र त्यापेक्षा वेगळा...वेधक आणि प्रेरक नाही का ?
आषाढमेघांनी | अंधारले नभ |
प्रकाशाचा कोंभ | पेंगुळला ||
पेंगुळला प्राण | ध्यास उसवला |
अभ्यास अडला | शून्यतीरी ||
शून्यतीरी नाव | खाई हेलकावे |
कैसे कोठे जावे | कळेचि ना ||
कळेचि ना पाणी | कुठे किती खोल |
डचमळे तोल | प्रयत्नाचा ||
प्रयत्नाची शिडे | तीही उतरली |
वेगे ओसरली | संकल्पना ||
संकल्पना धृव | क्षीण जुगुजुगू |
वरी जाता बघू | अस्तमान ||
अस्तमान ऐसे | अस्तित्व अवघे |
तोंच मेघी बघे | चंद्रबिंब ||
चंद्रबिंब चढे | मेघमालेवरी |
आनंदओवरी | लकाकली ||
लकाकली दीठी | मिटले लोचन |
घातले अंजन | केले जागे ||
केले जागे, कानी | वाजला अल्लख |
गुरूकृपासुख | ओतप्रोत ||

No comments:
Post a Comment