||आषाढाच्या प्रथम दिनी या ||
कोणा यक्षा बघुनी विरहाग्निमधे पोळताना |
शैलीं त्यांते विजनी विपिनी
प्रत्यही खंगताना ||
कोणा यक्षा बघुनी विरहाग्निमधे पोळताना |
शैलीं त्यांते विजनी विपिनी
प्रत्यही खंगताना ||
उत्कंठेने कनकप्रतिभा
जागुनी अंगभूत |
कालीदासा! कविकुलगुरो,
तू दिले मेघदूत ||
तप्तांची तू विकल ऐसी
दु:स्थिती पाहुनिया |
आषाढाच्या प्रथम तिथिला
मेघ देशी सहाय्या ||
तू मेघाचे मन वळविले
दूत होण्यासी तेव्हा |
पुन्हा आजि विनवुनी तया
भारती वर्षवावा ||
शब्दाधीशा! तुजसि कथितो
काम हे धार्ष्ट्य मोठे |
काव्ये ऐसा रुजुनी अससी
सख्यता खोल दाटे ||
आषाढाच्या प्रथम दिनीं या
आठवोनी महत्ता |
आजी आम्ही रमवित जगू
मेघदूतात चित्ता ||
आजी आम्ही रमवित जगू
मेघदूतात चित्ता ||
सोबतचे चित्र ज्येष्ठ वासुदेव कामत यांचे आहे .(या सप्ताहाच्या साप्ताहिक लोकप्रभेतील ते पानच इथे दिसते आहे ) 28/06/2014
No comments:
Post a Comment